४६वी राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धा

पुणे, ठाणे संघाला विजेता. नाशिक संघ ठरला उपविजयी…
नुकत्याच पार पडलेल्या ४६ वी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत मुलींमधे ठाणे तर मुलांमधे पुणे संघाने अजिंक्यपद पटकावले.

पद्मभूषण खासदार शरद पवार यांच्या आगामी वडदिवसानिम्मित महाराष्ट्र खो खो असोसिएशन चा मान्यतेने व आंबेगाव तालुका स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

मुलींच्या अंतिम सामन्यात ठाणे संघाने पुणे संघाचा ०९-०८ (५-३;४-५) अश्या अतिशय चुरशीच्या सामन्यात एका गुणाने परभा केला. या सामन्यात ठाण्याच्या अशिविनी मोरेने ३:३०, २:२०मि संरक्षण करत आक्रमणात २ गाडी बाद केले, रेश्मा राठोड ने २:२०, २:०० मि संरक्षण करत २ गाडी बाद केले तर गीतांजली नरसाळे ने १:४० मि संरक्षण करत आपल्या संघाला ला विजय मिळवून दिला. पुणे कडून खेळताना स्नेहल जाधव ने १:५०,३:१०मि संरक्षण करत २ बळी घेतले ऋतुजा भोरने २:१० मी संरक्षण करत २ गाडी बाद केले व दिव्य जाधव ने २:३०,१:५० मि संरक्षण केले.

पुण्याची नाशिक वर मात.

यजमान पुणे संघाने कुमार गटाच्या अंतिम सामन्यात नाशिक संघाचा पराभव केला. पुणे ने घरच्या मैदानावर १८-१४(१०-६:५-५) ने अंतिम सामना जिंकला. पुण्याकडून खेळताना राहुल मंडळ ने २:२०, २:०० मि संरक्षण करत २ गाडी बाद केले, संदेश जाधव ने २:००, १:३० मि संरक्षण करत आक्रमणात ४ गाडी बाद केले, आदित्य गणपुले ने १:४०,१:०० मि संरक्षण केले तर दिलीप खांडवी ने १:४०, १:२० मि संरक्षण करत आपल्या संघाला विजयश्री मिळवून दिला.
पुरस्काराचे मानकरी

सर्वोत्कृष्ट संरक्षक – राहुल मंडळ( पुणे), रेश्मा राठोड ( ठाणे).

सर्वोत्कृष्ट आक्रमक – संदेश जाधव (पुणे), स्नेहल जाधव (पुणे).

सर्वोत्कृष्ट अस्तपैलु – दिलीप खांडवी (नाशिक), अश्विनी मोरे (ठाणे).

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Blog at WordPress.com.

Up ↑

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: